नांदेडमद्धे गोदावरी नदीत 17 वर्षीय तरुणाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू
नवीन नांदेड-
विष्णुपुरी नांदेड येथील गोदावरी नदी काळेश्वर मंदिर परिसर लगत असलेल्या नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्ष युवकाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.५ मे रोजी घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.5 मे रोजी दुपारच्या वेळी विष्णुपुरी येथील गोदावरी नदी काळेश्वर मंदिर परिसराजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात साईनाथ विष्णू इंगळे, वय 17 रा.पाटील गल्ली, ता. कळमनुरी जि.हिगोली हा पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडुन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी तात्काळ नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी जीवरक्षक दलाच्या साह्याने शोध घेतला. तसेच यावेळी नांदेडच्या भोई गल्ली येथील गंगापुत्र जीवरक्षक दलाच्या पथकाने शोध घेतला असता सायंकाळी तरूणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी श्रीकांत गणेशराव काकडे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गवळी हे करत आहेत.