संविधान दिनी जन्मलेल्या चिमुकलीचे झाले असेही भव्य स्वागत…!

प्रा.प्रसेनजीत चिखलीकर यांचा आदर्श पायंडा

930

नांदेड / वाशिम –

माजी विद्यार्थी कल्याण संचालक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कालवश प्रा.डॉ.सत्यजीत चिखलीकर यांचे द्वितीय चिरंजीव ह्युमन वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रसेनजीत चिखलीकर यांना 26 नोव्हेंबर संविधान दिना दिवशी कन्यारत्न प्राप्त झाले तसेच याच दिनी त्यांची पत्नी मोनिका चिखलीकर यांचा सुद्धा जन्मदिवस होता. त्यांच्या सतत सामाजिक, शैक्षणिक व कुशल कार्यामुळे असा तिहेरी संगम येण्याचा योग त्यांच्या कुटुंबाला मिळाला.

प्रा.चिखलीकर यांचे सर्व कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून प्रा.प्रसेनजित चिखलीकर यांनी आपल्याला प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल स्त्री जन्माचे स्वागत म्हणून त्यांनी बाळाचे घरी आगमन झाल्यावर परंपरागत रूढी परंपरेला छेद देत जिलेबी न वाटता घरोघरी पेढे वाटून, फुलांचा वर्षाव करीत व ढोल-ताशे वाद्यांच्या गजरात धूम धडाक्यात स्वागत केले.

तसेच त्यांनी शाळेत वृक्षारोपण करून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून अनोखे स्वागत करून समाजाला एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. प्रा. प्रसेनजित चिखलीकर सर हे श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथे समाजकार्याचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे ते नेहमी एक आदर्श व आवडते प्राध्यापक राहिलेले आहेत तसेच त्यांच्या ह्युमन वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ते नेहमीच समाजाचं आपल्याला काही देणं लागतं या हेतूने समाजामध्ये समाज उपयोगी आगळे वेगळे उपक्रम राबवित असतात आणि दरवर्षी त्यांच्या व वडिलांच्या स्मृतिदिनी तसेच त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसा दिवशी गोरगरीब व पालावरील वस्तीच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना खाऊ देत असतात.

थंडीच्या दिवसांत रस्त्यावरील भिक्षेकरी व गोरगरीब गरजू लोकांना उबदार कपड्यांचे वाटप व अन्नदान करीत असतात. याही वर्षी त्यांनी असाच उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.या उपक्रमाबद्दल त्यांच्या समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.किशोर वाहाणे सर, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

मुलगा-मुलगी असा भेदभाव नको,असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र बहुतांश पालकांची मुलीपेक्षा मुलालाच जास्त पसंती असते यामुळेच स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तर विषम असून दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरातील दरी कमी करणे आणि कन्येच्या समानार्थ “बेटी बचाव बेटी पढाव” हे अभियान शासनामार्फत राबविले जाते स्त्री भ्रूणहत्या टाळून स्त्री जन्माचे स्वागत करावे याची समाजामध्ये जनजागृती पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही.

मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरकडून होणारा छळ नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भ लिंगनिदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी ऐकतो व पाहतो.स्त्रीभ्रूण हत्येची प्रवृत्ती हा निव्वळ गुन्हा नाही तर तो एक सामाजिक रोग आहे त्यामुळे तो कमी करायचा असेल तर समाजामध्ये स्त्रीचा सन्मान वाढेल असे वातावरण तयार केले पाहिजे.  चिखलीकर कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करून सुखद घटनाही समोर असल्याचे समाधानाचे वातावरण निर्माण केले आहे.

यावेळी त्यांचे सासरे अरुण धापसे व सासू अलका धापसे, सोनाली धापसे अंजली धापसे तसेच त्यांचे मित्र, समाजकार्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी योगेश महाजन बद्रीनाथ गायकवाड, श्रीकांत वाघमारे व अनिकेत दवंडे व विष्णू बोडके यांची उपस्थिती होती. या सामाजिक उपक्रमात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.