अडीचशे भाविकांचा जत्था “वारी बारा मल्हारीची” अंतर्गत माळेगांव यात्रेत खंडोबा दर्शनासाठी दाखल

414

लोहा, नांदेड –

“वारी बारा मल्हरीची” या अंतर्गत म्हाळसाकांत खंडेरायाच्या भाविकांना तसेच पुढील पिढीला खंडेरायाची बारा तीर्थ कुठे आहेत, त्याचा इतिहास, आदी संदर्भात माहिती व्हावी या उदात्त हेतूने पुणे येथील मल्हार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी भाविकांना नाममात्र भाडेतत्त्वावर दर्शन सोहळा घडवून आणल्या जातो. त्याचाच भाग म्हणून दक्षिण भारतातील प्रसिद्ध म्हाळसाकांत खंडेरायाच्या माळेगांव यात्रा नगरीत सदरील वारी मल्हारीची दाखल झाली. माळेगांव यात्रा ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे, पिरांगुट येथील मल्हार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वारी बारा मल्हारीची या उपक्रमांतर्गत खंडेरायाची बारा शक्तीपीठ दर्शन यात्रा सुरू असून त्यामध्ये जेजुरी, पाली खंडोबा, मैलार खंडोबा, मैलार लिंग, आदी मेलार खंडोबा, माळेगांव खंडोबा, नळदुर्ग अणदूर खंडोबा, शेगुड खंडोबा, दावडी खंडोबा, देवूरगुडा खंडोबा, मंगसुळी खंडोबा, सातार खंडोबा संभाजीनगर आदी बारा तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. सदरील यात्रेत जवळपास अडीचशे भाविकांचा जत्था आहे. यात्रेदरम्यान सहभागी भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोबत सर्व औषधे साहित्यासह डॉक्टर नियुक्त आहे.

माळेगांव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच हनुमंत धुळगुंडे यांच्या वतीने पंचायत सदस्य पाटील यांनी वारी मल्हारीचे प्रमुख तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी मते, मल्हार सेवक केतन लखवडे, मंगेश मोहळ, संदीप वेडे पाटील, जलिंधर जाधव, बबन कापसे, शिवभक्त अंन महराज चौधरी, डॉ. सिध्देश्वर पन्नासे सह बहुसंख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.