अर्धापुरच्या मालेगाव येथील सिमेंटच्या दुकानावर दगडफेक प्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दुकानाचे काचा फोडून पैसे व मोबाईल नेले चोरून

830

अर्धापूर, नांदेड –

तालुक्यातील मालेगाव येथील सिमेंटच्या दुकानावर दगडफेक करून काचा फोडल्या व मोबाईल व नगदी पैसे चोरून नेल्याप्रकरणी दुकान मालकाच्या फिर्यादीवरून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार आर. एस. नरवाडे यांनी दिली आहे.

मालेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात बाचाबाची होऊन प्रकरण मिटले होते. पुन्हा तु आमच्या मुलासोबत भांडण का केले म्हणून जिल्हा परिषद शाळेजवळ ऑटोच्या काचा फोडल्या तसेच राॅड, लाठी घेऊन सिमेंट विक्रीच्या दुकानावर येऊन थापड बुक्यानी मारहाण करीत दुकानावर दगडफेक करत काचा फोडल्या तसेच विवो कंपनीचा मोबाईल व नगदी ८४०० रू.चोरून चोरून नेले.

या प्रकरणी दुकान मालक अंकुश गणपती कदम रा.देगाव (कु) यांच्या फिर्यादीवरून १६ जणांविरुद्ध कलम ३९५, ४२७ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.