लोह्याच्या कारेगाव नजीक राष्ट्रीय महामार्गावरील धडकेत  हरीण गंभीर जखमी

920

लोहा, नांदेड-

राष्ट्रीय महामार्गावरील कारेगाव नजीक लोहा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर रस्ता ओलांडताना गाभण हरीण गंभीर जखमी झाले. कारेगाव येथील जागरूक नागरिकानी सदर बाब तात्काळ वनविभागास कळविली आणि जखमी हरणावर उपचार केल्यानंतर हरीणाचे प्राण वाचले. जखमी हरीण यास नंतर जंगलात सोडून देण्यात आले. सदरील घटना दि.२० रोजी सकाळी घडली.

तालुक्यातील कारेगाव जवळ नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना एका गाभण हरणास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात हरीण गंभीर जखमी झाले. सदरील माहिती गावातील नागरिकास समजताच त्यांनी सदर माहिती वन विभागाचे नारायण शेवडीकार यांच्या कानावर घातली. वनरक्षक परमेश्वर घुगे यांनी शेवडीकर यांच्या व स्थानिकांच्या मदतीने जखमी हरीणावर लोह्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. पशुवैद्यक विभागातील कर्मचारी अजय झाडे यांनी जखमी हरणावर उपचार करून ते वन विभागाकडे सुपूर्द केले. त्यानंतर वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्यास जंगलात सोडून दिले. जखमी हरीण हे गाभण असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.