भीम महोत्सवात नांदेडकरांना पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या गीतांची मेजवानी

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे संयोजकांनी केले आवाहन

1,924

नांदेड –

डॉ.बी.आर.फाऊंडेशनच्या वतीने सर्वपक्षीय भीम महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीची आंबेडकरी गायिका गिन्नी माही ( पंजाब ) यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम तसेच कृष्णाई पुरस्काराचे वितरण उद्या रविवार दि.17 एप्रिल रोजी सांयकाळी 6 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे होणार असून या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक बापूराव गजभारे व स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण हे निमंत्रित असून माजी खामदार पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांची उपस्थिती राहणार आहे. या भीम महोत्सव सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, खासदार हेमंत पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, आ.अमरनाथ राजुरकर, माजी खा.सुभाष वानखेडे, पीआरपीचे कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.बालाजीराव कल्याणकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.वसंतराव चव्हाण, आ. जितेश अंतापुरकर, महापौर जयश्रीतार्ई पावडे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती बापूराव गजभारे व पंढरीनाथ बोकारे यांनी दिली.

यावेळी कृष्णाई पुरस्काराचेही वितरण केले जाणाट असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार संत बाबा बलविंदरसिंघजी (कारसेवावाले), राज्यस्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने (नागपूर), जिल्हास्तरीय पुरस्कार प्रल्हाद कांबळे व छायाचित्रकार पुरस्कार ज्ञानेश्वर सुनेगावकर यांना या महोत्सवात दिला जाणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात
आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.