नांदेडमद्धे लवकरच भव्य लोककला महोत्सव आयोजित करणार – खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती

898

नांदेड –

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत लोककला महोत्सव व लावणी महोत्सव घेणारी नांदेड जिल्हा परिषद राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे. रसिकांना भूरळ घालणारी व कलावंतांचा मान-सन्मान करणाऱ्या या लावणी महोत्सवातून मनावरील ताण-तणाव दूर करणारे आहे. माळेगावातील महोत्सवाप्रमाणे नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भव्य लोककला महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादान जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

माळेगाव यात्रेतील लावणी महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने करण्यात आले.त्याचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, प्रकल्प संचालक डॉ.संजय तुबाकले, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख माधव पावडे, बबन बारसे, सचिन पाटील चिखलीकर, माजी सभापती आनंदराव पाटील, माणिकराव मुकदम, अतिरिक्त पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सरपंच धुळगंडे यासह विविध पक्षाचे प्रमुख, पदाधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती होती.

उद्घाटन प्रंसगी बोलतांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, यात्रेच्या वैभवात भर घालणारे स्व.विलासराव देशमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला. कोरोना काळानंतर यात्रा भरली. जिल्हा परिषदेच्या वतीने यात्रा भरवली जाते. लावणीचे मोठे रसिक उजागर व छुपे असतात. मनावरील ताण दूर करणारा व विरंगुळा म्हणून या कलेकडे पाहिले पाहिजे.

कला महोत्सव कै.व्यंकटराव मुकदम यांनी सुरु केला तर लावणी महोत्सव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव बेटमोगरेकर यांनी सुरू केला.या यात्रेतील हा महोत्सव अधिकाधिक लोकप्रिय झाला पाहिजे असेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ.संजय तुबाकले यांनी केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर, आमदार महोनअण्णा हंबर्डे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक कौशल्ये यांनी केले.

या लावणी महोत्सवात आठ कला संचांचे सादरीकरण झाले. यात अनुराधा नांदेडकर आणि संच, प्रेमकुमार मस्के संचलित स्वर संगम संच, वैशाली वाफचळेकर सनवाडी, आशा-रूपा परभणीकर, सरला पुणेकर, अंबिका-अनुराधा लखन गावकर, योगेश देशमुख पुणे यांचा तुमच्यासाठी काय पण या संचांनी बहारदार लावण्यांनी रसिकांना घायाळ केले.

Leave A Reply

Your email address will not be published.