लव्ह जिहाद व स्वप्नील नागेश्वर हत्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा

अज्ञातांकडून दगडफेकीने मोर्चाला गालबोट

1,757

नांदेड-

धर्मातर बंदी कायदा लागू करावा, श्रद्धा वालकर, निधी गुप्ता व नांदेड येथील स्वप्नील नागेश्वर हत्येच्या निषेधार्थ आणि लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजातर्फे आज मंगळवार दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशात हिंदू नागरिकांवर धर्मांधांकडून अत्याचार सुरु
आहेत.मुंबई येथील श्रद्धा वालकर या तरुणीची नवी
दिल्लीत आफताब पुनावाला याने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे.तसेच लखनऊ येथील निधी गुप्ता या तरुणीने धर्मांतर करण्यास विरोध केल्याने तीचा खून करण्यात आला. नांदेड येथील स्वप्नील नागेश्वर या तरुणाची प्रेमाच्या संशयावरुन गेल्या आठवड्यात डंकीन येथे लाठ्या काठ्यानी मारून हत्या करण्यात आली. या घटनेतील आणखी काही आरोपी फरार आहेत.अनेक हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे.

सरकारने धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, श्रद्धा वालकर व निधी गुप्ता यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा करावी, लव्ह जिहाद प्रकरणाची चौकशी करून कडक कायदा निर्माण करावा, स्वप्नील नागेश्वर खून प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी व अन्य मागण्यांसाठी आज दुपारी जुन्या नांदेड शहरातील कै.भोजालाल गवळी चौकातून आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला.

हा मोर्चा हबीब टॉकीज – जुना मोंढा- गुरुद्वारा चौरस्ता महावीर चौक- वजीराबाद चौक- छ.शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व साधूंनी सभेला संबोधित केले. मोर्चात हजोराच्या संख्येने महिला, मुली, नागरिक व विविध संघटनांचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन सामील झाले होते. यावेळी आफताबला फाशी द्या, स्वप्नीलच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सादर केले.

या मोर्चात खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.राजेश पवार, आ.भीमराव केराम, दिलीप कंदकुर्ते, ॲड.चैतन्य देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, भुंजग पाटील, जिल्हा प्रमुख माधव पावडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, ॲड.दिलीप ठाकूर, भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले, उद्धव ठाकरे सेनेचे माधव पावडे, दिलीप ठाकूर, प्रविण साले, कृष्णा देशमुख, दिपकसिंह रावत, दिलीपसिंघ सोडी, मिलिंद देशमुख, मॉन्टीसिंघ जहागिरदार, शीतल खांडील, विजय गंभीरे, बाळू खोमणे, भारत खडसे, व्यंकट मोकले, अनिलसिंह हजारी, आशिष नेरलकर, विनायक सगर, सुशील चव्हाण, यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव सहभागी झाले होते.

या मोर्चात महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार हे रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात कड़क पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अज्ञातांकडून दुकानावर दगडफेकीने मोर्चाला गालबोट

सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा शहरातील जुना मोंढा टॉवर भागात आला असता येथील फ्रेंड्स जर्दा स्टोअर या दुकानाच्या नाम फलकावर अज्ञातांनी दगडफेक केली. सदर दुकानातील काही वस्तू व दुकानाच्या फलकाचे नुकसान झाले, याठिकाणी काही काळ तणावाची परीस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीसांनी वेळीच दक्षता घेत परिस्थती नियंत्रणात आणली.

Leave A Reply

Your email address will not be published.