वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू

अर्धापूर तालुक्यातील सावरगावात श्री हनुमान मंदिरासमोर आंदोलन सुरू

562
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी काही दिवसापूर्वी राज्य सरकारने किराणा दुकानवर वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिका-यांनी अन्यत्याग आंदोलन दि.११ शुक्रवारी रोजी सुरू केले आहे.तर अन्नत्याग आंदोलनास गावकऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे ग्रामीण भागातील जनता वाईन विरोधात जन आंदोलन करणार असल्याची माहिती श्रीगुरूदेव सेवा मंडळाने दिली आहे.

राज्य सरकारने ग्रामीण भागातील किराणा दुकानावर वाईन विक्रीला जनतेचा जोरदार विरोध असून त्या शासन निर्णया विरोधात ग्रामीण भागातून जोरदार विरोध होत असला तरी सरकार मात्र वाईन विक्रीचा विषयावर गप्प असल्याने ग्रामीण भागातील किराणा दुकानावर वाईन विक्रीचा निर्णय शासनाने मागे घ्यावे अन्यथा या निर्णयामुळे पिढी बरबाद होणार नाही याची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात किराणा दुकानावर वाईन विक्रीच्या विरोधात उतरून सावरगाव ता.अर्धापूर श्रीगुरूदेव सेवा मंडळ जिल्हा प्रसारक गजानन योगाजी आबादार यांनी हनुमान मंदिरा समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनास भारतराव आंबोरे, किसन दुकानदार जाधव, बळीराम आबादार,दत्‍तरामजी इंगोले, सरपंच संभाजी पांचाळ, उपसरपंच उद्धवराव आबादार, ग्रा.स.भगत जाधव, नारायण आबादार, राजू पाटील आबादार यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे या अन्नत्याग आंदोलनाकडे शासन लक्ष देणार की राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी किराणा दुकानावर वाईन विक्रीला परवानगी देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
किराणा दुकानावर वाईन विक्रीला शासनाने परवानगी देऊ नये त्यामुळे अनेक जण वाईनच्या आहरी जाऊन तरूण पिढीला व्यसन लागेल व यामुळे महाराष्ट्र शासनाने किराणा दुकानावरील वाईन विक्रीला परवानगी देऊ नये अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष छगन पाटील सांगोळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.