अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव (म.)जवळ ट्रकच्या धडकेत आई ठार तर मुलगा गंभीर जखमी
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव म.हद्दीतील शिवामृत दूध डेअरी जवळ ट्रकच्या धडकेत आई ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१६ शनिवारी रोजी दुपारी घडली असून पोलीसांनी ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे.
महिला व मुलगा मोटारसायकल वर जात असतांना ट्रक चालकाने भरधाव वेगात ट्रक चालवून मोटर सायकलला उडवले यात रंजनाबाई लक्ष्मण कोरेबैनवाड (वय ४५ ) या गंभीर जखमी झाल्या व मुलगा कृष्णा लक्ष्मण कोरेबैनवाड यांचा एक पाय फॅक्चर झाला. दोघेही मेंडका ता.मुदखेड (ह.मु.नांदेड) येथील असुन दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे यांनी महामार्ग पोलिसांना कळवले असता रमाकांत शिंदे, सोनबा मुंडकर यांनी महामार्ग रूग्णवाहिकेने जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी रंजनाबाई कोरेबैनवाड यांना मृत घोषीत केले. तर कृष्णा कोरेबैनवाड गंभीर जखमी झाला असून नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपळगाव (म.)येथील अपघाताची माहिती मिळताच
पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे,महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शंकर भोसले, पोउनि.आदित्य लाकुळे,पोना ज्ञानेश्वर तिडके, कल्याण पांडे आदींनी रस्तावरील वाहतूक सुरळीत केली तसेच ट्रक क्र.एम.एच.२६ बीई.३२०५ व चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.