वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवाच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार

2,823

नांदेड –

भरधाव हायवा टिप्परने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक विवाहित महिला जागीच ठार झाल्याची घटना डेरला पाटीजवळ दि.13 मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.

लोहा येथील रफीक बाबु शेख हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-26-एस-2714 ने त्यांची मुलगी अफरीन बेगम महमद अझरोद्दीन रा.परभणी हिच्यासोबत नांदेडच्या खाजगी दवाखान्यात तपासणी करीता आले होते. लोह्याकडे परत जाताना डेरला पाटीजवळ पाठीमागून येणारा हायवा क्रमांक एमएच-40-बीजी-5559 च्या चालकाने भरधाव वेगात धडक दिल्याने अफरीन शेख, वय 32 वर्षे जागीच ठार झाली तर दुचाकी चालक रफीक शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातस्थळी सोनखेड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, पोहेकॉ नागरगोजे, बालाजी शेटे, वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, अपघातग्रस्त हायवा चालक फरार झाला असून हायवा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.