आम आदमी पार्टीचा बोर्ड प्रत्येक वॉर्डात आणि प्रत्येक गावात लागावा..! -डॉ.अवधुत पवार

155

नांदेड –

आम आदमी पार्टीचे जनसंपर्क कार्यालय उदघाटन व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम यांच्या वाढदिवस साजरा करताना जिल्हा सचिव डॉ.अवधुत पाटील पवार म्हणाले की, आम आदमी पार्टीचा बोर्ड प्रत्येक वॉर्डात व प्रत्येक गावात लागावा…!

दिल्ली नंतर पंजाब या राज्यात आम आदमी पार्टीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता महाराष्ट्रात ही आम आदमी पार्टी नगरपालिका नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच पार्टीने घोषित केले आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी पार्टीचे कार्यालय सुरू होत आहे. दि.1 जुलै रोजी जिल्हा सचिव डॉ.अवधुत पवार यांच्या कार्यालयाचे उदघाटन एक आम व्यक्ती वॉचमन दिगंबर गायकवाड यांच्या हस्ते सिडको मोंढा येथे करण्यात आले.

या प्रसंगी नरेंद्रसिंघ ग्रंथी,ॲड. रितेश पाडमुख,ॲड. जगजीवन भेदे, अजित बनसोडे यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदमसह सचिव रितेश पाडमुख, दक्षिण विधानसभा प्रमुख जगजीवन भेदे, युवा जिल्हाप्रमुख अजित बनसोडे, पंढरी मोरे, बालाजी मोरे, माधव रिंघलवाड, किशोर गच्चे, माधव पवार, संभाजी चंदापुरे, डॉ.संभाजी पवार यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.