माहूर येथील कृषी अधिकारी सात हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

842

माहूर, नांदेड –

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे मंजूर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यास देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच घेणार्‍या माहूर येथील कृषी अधिकार्‍यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सदरील कारवार्ई माहूर येथे गुरुवार दि. 24 मार्च रोजी करण्यात आली.

किनवट येथील पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी तथा माहूर येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार सांभाळणारे आरोपी संजय एकनाथ घुमटकर याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मंजूर असलेल्या विहीर बांधकामाची पाहणी केली.उर्वरित मंजूर असलेल्या योजनेची रक्कम तक्रारदाराच्या पत्नीच्या खात्यावर अदा करण्यासाठी संजय घुमटकर यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली होती.पडताळणीअंती आरोपी घुमटकर याने 7 हजार रुपये नगद स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवार्ई माहूर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत परिसरात करण्यात आली. सदर कारवाई पीआय ढवळे, संतोष शेटे, किशन चितोरे, एकनाथ गंगातीर्थ, शेख मुजीब यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.