जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लागले सर्वांचे लक्ष ; अर्धापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार लागले कामाला

653
अर्धापूर, नांदेड –

तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट, तर पंचायत समितीचे सहा गण होणार आहेत. लहान, येळेगाव व मालेगाव गटातील कोणती गावे कोणत्या गटात समाविष्ट होतात तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होतात याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहेत.

आगामी जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग कधी जाहीर करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा निर्णय लागत नसल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुक असलेले काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, संभाजी ब्रिगेड, प्रहार, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अपक्ष तर दिल्ली, पंजाब राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पार्टीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक मैदानात उतरणारे उमेदवार गावागावात भेटीगाठी करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे.

आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेत इच्छुकांनी सोईच्या गटाची चाचपणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे ३ गट आणि पंचायत समितीचे ६ गणातील इच्छुक निवडणूकीच्या तारखा लांबणीवर पडत असल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड होत असून अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत. येत्या काही दिवसात नवीन गट व गणांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.