धनुर्विद्या खेळामुळे पाल्याचा सर्वांगीण विकास – महापौर जयश्रीताई पावडे
नांदेड –
विविध खेळ खेळल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होतो तर धनुर्विद्या खेळल्याने एकाग्रता वाढते, मन एकाग्र होते व त्यात सातत्य ठेवल्यास करिअरही करता येते असे मत नांदेडच्या महापौर जयश्रीताई पावडे यांनी व्यक्त केले. त्या आर्चरी स्कूल नांदेड श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे आयोजित तेराव्या जिल्हास्तर धनुर्विद्या स्पर्धेत बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, संघटना सचिव तथा मुख्य प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड, दंतरोग तज्ञ डॉ.रूपाली माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अनंत बोबडे म्हणाले की एखाद्या शहराचा विकास करावयाचा असेल तर त्या शहरात विविध ऑलम्पिक मान्यताप्राप्त खेळाची मैदाने असणे प्रामुख्याने गरजेचे असून नांदेड महापालिकेनेही त्यासाठी पुढाकार घेऊन काही खेळ व काही खेळाडूंना दत्तक घेण्याचे आवाहन त्यांनी महापौरांना केले.यावेळी वृषाली पाटील यांनी नांदेडच्या निवडलेल्या 14 वर्षाखालील व 9 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा इंडियन रिकव्हर व कंपाउंड प्रकाराचा संघ वसमत जिल्हा हिंगोली येथे आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत जात असल्याची माहिती दिली. महापौरांच्या हस्ते मालोजी कांबळे, स्पर्धा संचालक स्वप्नील सोनुने व माणिक केंद्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पालक व धनुर्विद्याचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा ( Read This ) : हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय आणि म्हैस ठार; तालुक्यातील खडकी (बा) आणि पावनमारी परिसरातील दुर्घटना
विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन महापौर जयश्रीताई पावडे, आनंत बोबडे, वृषाली पाटील जोगदंड, डॉ.रूपाली माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरासाठी निवड झालेल्या खेळाडूमध्ये नऊ वर्षाखालील मुलांमध्ये अमय आमदुरे, अनिकेत नागरगोजे, अरेबुद्धीन काजी, दत्ता मोरे, मोहम्मद बिलाल व मुलींमध्ये संस्कृती मुधोळकर यांची इंडियन प्रकारात तर सक्षम सूर्यवंशी, सौंदर्य माने व आरोही जाधव यांची तर रिकव्हर प्रकारात 14 वर्षाखालील मुलांमध्ये श्रेयश नकाते, श्रेयांश शेळके, तेजस दमकोंडवार, स्वराज कांबळे, सोनटक्के यांची मुलांमध्ये तर मुलींमध्ये राशी टेळकीकर,अक्षरा राठोड, खुशी पुंजरवाड, आराध्या जगताप यांची इंडियन राऊंडमध्ये निवड करण्यात आली.
ज्ञानेश चेरले, प्रफुल जाधव, आर्यन पुंजरवाड, उज्वल सूर्यवंशी, अथर्व भुसेवार, मधुरा चौरे, अक्षरा येरडलवार यांची रिकव्हर व कंपाउंड प्रकारात निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी ज्ञानोबा नागरगोजे, सीमा जाधव , पृथ्वीराज चव्हाण, अमरनाथ मोरे, पृथ्वीराज अभिजित कदम, सतीश मुधोळकर यांनी मेहनत घेतली.