लोहा पंचायत समिती कार्यालय सभागृहात तालुक्यातील शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

387

लोहा, नांदेड |

येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच तालुक्यातील विविध शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे यांनी घेतली. बैठकीस बहुसंख्य शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

लोहा पं.स.कार्यालयातील सभागृहात गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील जवळपास सर्वच शिक्षक संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.बैठकीत तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास, तालुका गुरुगौरव पुरस्कार निवड व वितरण, शालेय विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करून घेणे यासह अनेक विद्यार्थी व शिक्षक हिताच्या प्रश्नावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, बी.पी. गुट्टे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बाबुराव फसमले, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी डफडे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, राज्य संघटक अशोक मोरे, शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर, शिक्षक संघाचे विभागीय उपाध्यक्ष पी.डी.पोले, प्रहार शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष मल्लिकार्जुन जोडराणे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुर्तूज, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष साखरे,अखिल शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगल सोनकांबळे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष भांगे, शिक्षक संघाचे जी.एस.उप्परवाड, पुरोगामी संघटनेचे विलास नाईक, बसवेश्वर भुरे आदीसह बहुसंख्येने विविध शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.