अर्धापूर तालुक्यातील लोणी बु.येथे अनिरुद्ध वनकर यांचा ‘वादळवारा’ गीत गायनाचा कार्यक्रम

आज रविवारी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम सुरू होणार

247

अर्धापूर, नांदेड-

तालुक्यातील लोणी (खु) येथे “भीमसूर्याचा वादळवारा” अनिरुद्ध वनकर यांचा बुद्ध भीम रजनी संगीत व धम्मदेशनेचा कार्यक्रम दि.५ रविवारी सायंकाळी ६ वा.लोणी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अर्धापूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृऊबाचे संचालक संजय लोणे यांनी केले आहे.

तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महामानवाच्या जयंती निमित्त भीमसूर्याचा वादळवारा भिमशाहीर अनिरुद्ध वनकर यांचा बुद्ध भीम रजनी संगीताचा व धम्मदेशना कार्यक्रमास बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डी.पी.सावंत,आ.अमरनाथ राजूरकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, भाऊरावचे चेअरमन गणपतराव तिडके, उपाध्यक्ष प्रा.कैलास दाड, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मारुती शंखतीर्थकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.मी वादळवारा फेम गायक अनिरुद्ध वनकर यांचा बुद्धभीम रजनी संगीताचा कार्यक्रम कालवश निवृत्तीराव लोणे यांचे स्मारक लोणी खु.ता.अर्धापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अर्धापूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच अनुसयाबाई लोणे उपसरपंच संभाजी लोणे, ग्रा.प.स.सुनील शिंदे, कृऊबाचे संचालक संजय लोणे, सुरेखा लोणे, सुभद्राबाई लोणे, सविता जाधव, पार्वतीबाई जाधव, तुकाबाई शिंदे, काँग्रेसचे बुथ अध्यक्ष राजेश लोणे,नागसेन लोणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.