प्रधानमंत्री घरकुल योजनेचे 30 जून पर्यंत अर्ज दाखल करावे-नगराध्यक्ष छत्रपती कानोडे
अर्धापूर, नांदेड-
प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मिळण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची 30 जून ही तारीख शेवटची आहे.शहरातील घरकुल घेणाऱ्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना कुणाला राहण्यासाठी पक्के घर नाहीत, अशा जनतेला स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी ही योजना आहे. या योजने अंतर्गत प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना घरकुल प्रदान करण्यात येते व या योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.
अर्धापूर शहरातील गरजू लाभार्थ्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दि.३० जून पर्यंत सर्व कागदपत्र नगरपंचायत कार्यालयात दाखल करावे. या कालावधीत शिल्लक राहिलेल्या घरकूल लाभ घेणा-यांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज नगरपंचायत कार्यालयास सादर करावे, असे आवाहन नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी केले आहे.