तलवारीच्या धाकावर भरदिवसा सशस्त्र दरोडा ! काँग्रेसचे मारोती कवळे गुरुजींच्या सिंधी येथील पतसंस्थेत दोन लाखांची लूट; थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, एकास नागरिकांनी पकडले (पाहा व्हिडिओ बातमी)

6,740

नांदेड  |

जिल्ह्यातील उमरी तालुक्‍यातील मौ.सिंधी येथील कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेत सहा दरोडेखोरांनी दिवसा- ढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला. तलवारींचा धाक दाखवत बँकेमधून 2 लाख 2 हजार 490 रुपयांची रोकड पळविली. शनिवारी (दि.1) दुपारी दोन वाजेच्या सुमारास या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून दरोड्यात एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून, पळून जाणाऱ्यांपैकी एका दरोडेखोरास पकडण्यात गावातील नागरिकांना यश आले आहे. बाकीचे दरोडेखोर मात्र दुचाकीवरून उसाच्या फडातून पळ काढत पसार झाले.

             थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उमरी- नांदेड महामार्गावरील सिंधी गावाजवळ कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शाखा आहे. तीन दुचाकींवरून सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून या बँकेत घुसले. या सर्वांच्या हातात तलवारी होत्या. प्रत्येकाने आपल्या जवळील तलवार उपसत तेथील कर्मचाऱ्यांना एका बाजूला गोळा केले.तलवारीचा धाक दाखवून कॅशिअरजवळील दोन लाख 2 हजारांची रोकड घेऊन हे दरोडेखोर पळून गेले.तसेेेच तलवारीने संगणकाची तोडफोड केली व एका कर्मचाऱ्यास जखमी करून धुडगूस घातला.

यावेळी रोकड घेऊन दुचाकीवरून पळून जात असताना घाई गडबडीत एक दरोडेखोर खाली पडला. काही कर्मचारी व जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. मनजितसिंघ किशनसिंघ चिरपल्लीवाले, वय 30, रा.नंदिग्राम सोसायटी, नांदेड असे पकडलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या, तसेच आजूबाजूच्या लोकांचा मोठा जमाव घटनास्थळी जमला. दरोडेखोरास जमलेल्या जमावाने पोलिसांच्या हवाली केले. दुचाकीवरून पडून एक दरोडेखोर जखमीघटनेची माहिती मिळताच उमरी येथील पोलीस निरीक्षक मोहन भोसले, नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

 

   एका दरोडेखोरास पकडून चोप देताना नागरिक

मनजित सिंघ हा दरोडेखोर पळून जाताना दुचाकीवरून पडल्याने जखमी झाला असून, पोलिसांनी त्यास उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत या दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. इतर इतर पळून गेलेल्या दरोडेखुरांना आम्ही लवकरात लवकर जेरबंद करू, असा विश्वास उमरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी व्यक्त केला आहे. हे सहाही दरोडेखोर रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांची ही पतसंस्था असून, सिंधी येथे व्हीपीके समूहाचा गुळपावडरचा कारखाना आहे. या कारखान्यात शेकडो कर्मचारी काम करतात. त्यांचे पगार व शेतकऱ्यांच्या उसाचे लाखोंचे बिलाचे देवाणघेवाण येथूनच केले जाते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशत पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.