लोणी येथील सेवा सोसायटीवर अशोकराव गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लोणी पॅटर्न दिसणार ?

1,005

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर तालुक्यातील लोणी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अशोकराव बुटले, महेश बुटले, सुनिल शिंदे व गौतमराव लोणे गटाचे नऊ उमेदवार विजयी झाले तर सरपंच प्रतिनिधी विजय भुस्से,कृऊबाचे संचालक संजय लोणे गटाचे चार उमेदवार विजयी झाले. दि.१३ फेब्रुवारी रोजी मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय जळके, सचिव सखाराम पवार, पंडितराव कपाटे, बंडू टेबूलवार आदींनी निवडणुकीचे काम पार पडले.

अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लोणी सेवा सहकारी सोसायटीवर बुटले, शिंदे व लोणे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. १३ पैकी ९ जागेवर विजय मिळवत शेतकरी सहकार पॅनलला बहुमत मिळाले आहे. लोणी (बु.)चे सरपंच प्रतिनिधी विजय पाटील भुस्से, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लोणे, सुनिल लोहकरे यांच्या गटाच्या शेतकरी विकास पॅनेलला चार जागेवर विजय मिळाला आहे.

रविवार 13 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत सुनिल शिंदे, अशोकराव बुटले, मारोतराव फाटेकर, नागोराव खुरगावकर, महेश बुटले, दतराव बागल, गंगाधर बक्केवाड, गौतमराव लोणे, पार्वतीबाई रामजी कापसे या शिंदे-बुटले-लोणे गटाचे नऊ उमेदवारांनी विजयी मिळवला. तर भुस्से, लोणे, लोहकरे गटाचे शिवलिंग भुस्से, जगजितसिंह लोणीवाले, गोविंद कापसे, गोदावरीबाई लासिनकर या चार जणांनी विजय मिळविला. आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लोणी सेवा सहकारी सोसायटी पॅटर्न केला तर विरोधी पक्षाला यश मिळेल अन्यथा अवघड परिस्थिती आहे. काँग्रेस तालुक्यातील सर्व शक्ती पणाला लावून नगरपंचायत पॅटर्न राबविणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.