रमिंदरकौर मोदी यांना “अवंतिका एज्युकेशन राष्ट्रीय अवॉर्ड 2022” प्रदान 

दिल्ली येथे भव्य कार्यक्रमात स्वीकारला पुरस्कार !

362
नांदेड-

मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षाविद व माउंट लिट्रा झी स्कूल नांदेड शाळेच्या नवनियुक्त प्राचार्या सौ. रमिंदरकौर मोदी यांना दिल्ली येथील नामांकित “अवंतिका एज्युकेशन अवॉर्ड 2022” सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील हिंदी भवन येथे दि.16 एप्रिल संस्थेतर्फे आयोजित 37 व्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मिसेज इंडिया इंटरनॅशनल, साहित्यिक, लेखक आणि शिक्षाविद डॉ. सौ. परिन सोमानी आणि लोकसभा सदस्य खासदार श्री.प्रवीण कुमार निषद यांची उपस्थिति होती. तर विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून बेंगलोर येथील स्टेफिटचे चेअरमन डॉ.जी. के.गणपती रेड्डी, आय.एम.एस.नोएडा येथील अधिष्ठाता डॉ मंजू गुप्ता, शिक्षण भारतीचे माजी विभागीय अधिकारी डॉ.उपेंद्र कौशिक, जी.एस.बी.मथुराचे संचालक पद्मश्री मोहन स्वरुप भाटिया, अर्वाचीन भारती भवन संचालक डॉ.अनुरूप शर्मा, नवजीवन अकॅडमी ग्रुप ऑफ स्कूल न्यू दिल्लीचे चेअरमन श्री.आर.के.शर्मा, माजी विभागीय संचालक दिल्ली श्री.एल.के.खुराना, संस्थेचे राष्ट्रीय कार्यक्रम संचालक किशोर सिंग चौहान, संचालक डॉ. आनंद अग्रवाल आणि सचिव सौ.रजनी अग्रवाल यांची उपस्थिती लाभली होती.

संस्थेचे मुख्य संचालक डॉ.आनंद अग्रवाल यांनी अवंतिका अवॉर्डच्या गेल्या 37 वर्षांच्या मार्गक्रमणाविषयी माहिती सांगितली. खासदार प्रवीण कुमार निषद यांनी पुरस्काराची परंपरा 37 वर्षे अबाधित राखल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या.पद्मश्री मोहन स्वरुप भाटिया, डॉ.मंजू गुप्ता आदींनी मनोगत व्यक्त केले.सौ.रमिंदरकौर मोदी यांना अवॉर्ड मोमेंटो, प्रमाणपत्र, शाल, पुस्तक प्रदान करण्यात आले. नांदेड येथून शिक्षण क्षेत्रात योगदान देत सौ.रमिंदरकौर मोदी यांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली असे वक्तांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी भारतातून विविध राज्यातून आलेल्या प्राचार्य, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, शिक्षक यांची उपस्थिती होती. अवंतिका एज्युकेशन अवॉर्ड संस्था दिल्लीत कार्यरत असून दिल्ली तसेच देशातील विविध राज्यात सुद्धा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करीत आहे. तर भारताबाहेर सुद्धा पुरस्कार वितरणाचे अनेक कार्यक्रम होत आहेत. सौ.रमिंदरकौर मोदी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.