वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांचे आज गुरुवारी नांदेड शहरात आगमन

207

नांदेड –

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे ३ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता हेलिकॉप्टरने नांदेडच्या ‘सिडको’ वसाहतीतील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आगमन होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे ३ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता सिडको, नांदेड येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आगमन होणार आहे. दरम्यान, तालुका क्रीडा संकुलात आगमन झाल्यानंतर ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे मोटारीने ‘सिडको’तील संभाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा बसवेश्वर चौक, मामा चौक, जुना कौठा, गोवर्धन घाट पूल, वजिराबाद चौक, शिवाजीनगर मार्गे नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण होईल. तदनंतर ॲड. प्रकाश  आंबेडकर यांची नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद होईल. त्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. गुरूवारी त्यांचा नांदेड शहरातील विश्रामगृहात मुक्काम राहील.

४ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे सिडको, नांदेड येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावरून हेलिकॉप्टरने तेलंगणा राज्यातील म्हैसा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी प्रयाण होईल. म्हैसा येथील कार्यक्रम आटोपून ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजेदरम्यान, हेलिकॉप्टरने पुन्हा सिडको, नांदेड येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आगमन होईल. थोड्यावेळानंतर सिडको, नांदेड येथून ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे हेलिकॉप्टरने परत पुण्याकडे प्रयाण होणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड व महानगर महासचिव अमृत नरंगलकर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.