माहूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.अण्णासाहेब पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

471

माहूर, नांदेड –

लातूर येथे झालेल्या एका खुनाच्या प्रकरणाचा तपासिक अधिकारी म्हणून अण्णासाहेब पवार यांनी योग्य तो तपास लावून दोषारोपपत्र न्यायालयात  सादर केले होते. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दि.17 फेब्रु.रोजी 8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सध्या पवार हे माहूर पोलीस ठाण्यात स.पो.नि.या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव व पो.नि.नामदेव रिट्ठे यांच्यासह राजकीय नेते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लातूर येथील संजय नगर मध्ये दि.16/4/2018 रोजी एका व्यक्तीचा खून झाला होता.त्याचा तपास अण्णासाहेब पवार व संतोष जाधव यांनी केला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायाधीश ए.व्ही.गुजराथी यांनी 8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.