नांदेड जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा दिल्लीत सन्मान ! ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी प्रमिल नाईक यांची निवड

358
माहूर, नांदेड –
अविकसित भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड़याच्या मातीतील पोरं दिल्ली दरबारात आपलं आढळ स्थान बनवू शकतात असे अनेक वेळा सिद्ध झाले असून त्यात भर म्हणून किनवट, माहूर भागातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेतृत्व प्रमिल विठ्ठलराव नाईक यांच्या काँग्रेस संघटनामधील समर्पित कार्याची दखल 24, अकबर रोड वरील राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्यालयाने घेतली असून पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार प्रमिल नाईक यांची  ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड़ झाली आहे. या निवड़ीचे पत्र ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हस्ते दिल्ली येथील पक्ष कार्यालयात देण्यात आले,असून लवकरच त्यांच्यावर एका राज्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.

प्रमिल नाईक हे विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षासाठी समर्पित होऊन काम करत असून पक्ष संघटन कौशल्याच्या त्यांना 25 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे.यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रात राज्य पातळीवर NSUI व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केलं आहे. संपूर्ण भारत देशातुन बंजारा समाजातून एवढ्या तरुण वयात राष्ट्रीय समन्वयक या जबाबदारीच्या पदावर जाणारे ते देशातील पहिले युवक आहेत. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण नांदेड़ जिल्ह्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या ओबीस सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड़ झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे केंद्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उपाध्यक्ष संजय राठोड, आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डीपी सावंत, आ.राजेश राठोड, जितेश अंतापुरकर यांनी प्रमिल नाईक यांचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.