भाजपा युवा मोर्चाची अर्धापूर तालुका कार्यकारिणी जाहीर

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी धर्मराज देशमुख यांची निवड

1,307
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड-
अर्धापूर तालुका भाजपा युवा मोर्चा बैठक दि.३० रविवारी रोजी देशमुख मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुका कार्यकारिणीची घोषणा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांनी जाहीर केली.
अर्धापूर तालुका भाजपा युवा मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मराज देशमुख,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले, नगरसेवक बाबुराव लंगडे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे, नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादराव माटे, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, जिल्हा सरचिटणीस रामराव भालेराव, ता.सरचिटणीस अवधूत कदम, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा इंगोले,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे, युवा नेते विराज देशमुख, नागोराव भांगे यांच्या उपस्थितीत भाजपा युवा मोर्चाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी धर्मराज देशमुख यांची निवड झाल्याबद्दल नगरसेवक बाबुराव लंगडे, प्रतिनिधी प्रल्हादराव माटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष विठ्ठल बंडाळे, ता.उपाध्यक्ष राम कदम कोंढेकर, कुश भांगे, रमाकांत राऊत, व्यंकटेश बुटले, अनिल बच्चेवार, सरचिटणीस परमेश्वर लालमे, सरचिटणीस तुळसीराम बंडाळे, संतोष पवार,चिटणीस शिवराम साखरे, विठ्ठल काकडे, माधव धात्रक, गिरिधर पवार, महेश भुस्मे, गोविंद नवले, वैभव काळे, कोषाध्यक्ष सतिश कल्याणकर, सह कोषाध्यक्ष दत्ता धुमाळ, सोशल मिडिया अध्यक्ष हेमंत देशमुख, सोशल मिडिया उपाध्यक्ष मुंजाजी राजेगोरे, प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब गाढे, कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर आढाव, गजानन पवार, साईनाथ डोईफोडे, प्रमोद नरोटे, गणेश गोरे, कैलास भरकड, नामदेव उबाळे, नागेश कपाटे, विकास बंडाळे, मंगेश बंडाळे, गंगाधर खुळे आदींची निवड करण्यात आली आहे. यावेळी विश्वनाथ खुळे, गोविंद लंगडे, विजय कल्याणकर, वैभव काळे, आकाश धात्रक यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.