अर्धापुरात भाजपचे आंदोलन; विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीसांनी दिलेल्या नोटीसीची होळी करत निषेध

831
अर्धापूर, नांदेड –

माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे कटकारस्थान,षडयंत्र उघडकीस आणल्याने राजकीय द्वेषापोटी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीच्या सरकारने कलम १६० प्रमाणे पोलिसांनी नोटीस दिली आहे.

याच्या निषेधार्थ आज दि.१३ रविवार रोजी महात्मा बसवेश्वर चौकात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, नगरपंचायत गटनेते बाबुराव लंगडे, नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादराव माटे, भाजपा जिल्हा चिटणीस डाॅ.लक्ष्मणराव इंगोले, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे,तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी यांच्या नेतृत्वाखाली नोटीस दहन करत प्रंचड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडत आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करताना भाजयुमोचे जिल्हा चिटणीस आनंद वैद्य, भाजपा अजामो. जिल्हा सरचिटणीस रामराव भालेराव, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे, सरचिटणीस तुळशीराम बंडाळे, सरचिटणीस गोविंद माटे, युवा नेते अमोल कपाटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष तुकाराम माटे, अवधूत कदम, गोविंद लंगडे, कुश भांगे, लक्ष्मण कुरूडवाड, चांदू नवले, उपसरपंच विठ्ठल बंडाळे, विश्वनाथ खुळे आदीसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.