अर्धापुरातील शेनी पार्डी येथील शनिमंदीरात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
अर्धापूर, नांदेड –
तालुक्यातील शेनी- पार्डी येथील शनिमंदीराच्या मैदानावर जिल्ह्यात उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा असल्याने शनि अमावस्या निमित्त युवक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, यावेळी तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनि अमावस्याला शिंगणापुरला भाविकांची मोठी गर्दी असते, त्याच धर्तीवर अल्पकालावधीत नवसाला पावणारा शनि देव म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालेले शेनीपार्डी शिवारातील शनि मंदीरात भाविकांची मोठी गर्दी असते. यावेळी शेनीपार्डीच्या युवकांनी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा असल्याने जिल्हा शांतता बैठकीतील जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन केले.
यावेळी जिल्हा सचिव निळकंठराव मदने यांनी रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले.याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दिवसभर शिरा पुरीच्या महाप्रसादाचे आयोजन मारोती साबळे पार्डीकर यांनी केले. महेश धुमाळ शेनीकर, भाऊसाहेब शिंदे, कृष्णा धुमाळ, साहेबराव हापगुंडे, भारत हापगुंडे, शंकर हापगुंडे, गंगाधर साबने, लक्ष्मण गजभारे, अविनाश शिंदे,पप्पू धात्रक, सोनाजी बोडल, मनोज धात्रक, दता धुमाळ, धीरज काळेवार, प्रदीप गोरे, माधव धात्रक, किशोर खांडरे, यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. शेनी पार्डीच्या भाविकांनी दिवसभर श्रमदान करुन शनिमंदीरात सेवा दिली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले.