बुलढाणा अर्बन बँकेकडून अर्धापुरात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

261

अर्धापूर, नांदेड –

येथील बुलढाणा अर्बन बँकेकडून अर्धापूर नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, यावेळी सर्व मान्यवरांची उपस्थिती होती. अर्धापुरात मंगळवारी बुलढाणा अर्बन बँकेकडून अर्धापूर नगरपंचायतचे सर्व पक्षीय नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बँकेचे शाखाधिकारी रामचंद्र बोंढारे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसव्वीर खतीब, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, संचालक प्रवीण देशमुख, जिल्हा सचिव निळकंठ मदने, गटनेते बाबुराव लंगडे, नगरसेवक शेख जाकीर, नगरसेवक सोनाजी सरोदे, मुख्तेदरखान पठाण
प्रल्हादराव माटे, सलीम कुरेशी, प्रल्हाद माटे, व्यंकटी राऊत, माजी नगरसेवक गाजी काजी, डॉ.विशाल लंगडे यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्व पक्षीय नगरसेवक व प्रतिनिधींचा शाल, हार, व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे म्हणाले की, संस्था व सामाजिक संघटनांनी शहराच्या विकासासाठी समोर यावे, आपण विकासकामांसाठी समन्वय घडवून आणू असे ते म्हणाले. यावेळी शेटे, देशमुख, खतीब यांनी सत्काराला उत्तर दिले.अध्यक्षीय भाषणात बोलतांना बोंढारे म्हणाले की, हा सत्कार बँकेचे संस्थापक राधेश्यामजी चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा अर्बन बँकेच्या सहा राज्यांतील ४६५ शाखांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात असून, या बँकेचे १७५०० करोडची उलाढाल झाली असल्याने मोठ्या प्रमाणावर सभासदांचा विश्र्वास मिळविल्याने बँकेला सामाजिक कामात प्रोत्साहन मिळते, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निळकंठ मदने यांनी तर आभार सतीन देशपांडे यांनी मानले. याप्रसंगी शहाबाज खान पठाण, अझर काझी, वसंत राऊत, सुनिल मोरे, संदीप कदम, राहुल माटे, बालाजी मैड, चद्रकांत पत्रे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.