पै.बाबुराव पाटील सवंडकर यांची प्रथम पुण्यतिथी साजरी

137

कळमनुरी, हिंगोली –

येथून जवळच असलेल्या मौजे रेडगांव येथील जुन्या काळातील नामवंत मल्ल कै.बाबुराव पाटील सवंडकर यांची प्रथम पुण्यतिथी किर्तनकार श्री ह.भ.प.गंगाधर महाराज कुरूंदकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाने दि. १६ एप्रिल, शनिवार रोजी रेडगाव ता.कळमनुरी जि.हिंगोली. येथे साजरी करण्यात आली.

यावेळी किर्तनाच्या कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तसेच किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून भेट देण्यासाठी टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव जाधव, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष कुमार वारे यांच्यासह मान्यवरांनी भेट देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

कै.बाबुराव पाटील सवंडकर हे १९६०-७० दशकातील नामवंत मल्ल म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक मोठ-मोठ्या मल्लांशी कुस्त्या करत त्या निकाली काढून इतिहास निर्माण केला होता अशा आठवणी आजही परिसरातील अनेक बुर्जगांच्या तोंडून ऐकायला मिळतात.

कै.बाबुराव पाटील सवंडकर हे टोकाई साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील तसेच युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाजीराव पाटील सवंडकर यांचे वडील होतं. त्यांच्या पश्‍चात चार मुलं, चार मुली, सुना,नांतवंड, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.