लोह्यात केंद्रस्तरीत शिक्षण परिषद संपन्न; विविध उपक्रमावर चर्चा

89

लोहा, नांदेड –

शहरातील जुना लोहा भागातील जि.प.के.प्रा.ब्रांच शाळेत केंद्र स्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. त्याप्रसंगी “शिक्षण आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबवायचे यासह इतर अनेक शैक्षणिक विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष इमामसाब लदाफ हे होते. तर प्रमुख म्हणून डाएटचे प्रा.चंद्रकांत धुमाळ, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी बिभीषण गुट्टे, केंद्रप्रमुख एन.एस. कसबे, केंद्रीय मुख्याध्यापक श्रीमती बी.एम. गुंठे यांची उपस्थिती होती. सदर परिषदेस साधन व्यक्ती कतुरे, एम. एन.केंद्रे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी ब्रांचचे शिवधन राठोड, मुख्याध्यापक खेडकर, श्रीमती.केंद्रे, मुख्याध्यापक एच.जी.पवार, जय महाराष्ट्र प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष भालेराव, दिलीप सोनवणे, शिक्षक पतसंस्थेचे माजी सचिव ज्ञानोबा घोडके, गायकवाड, आर.जी.वाघमारे, आर.एस.कदम, डी.बी. पवार, डी.व्ही.कोरडे, टी.आय.शेख, श्रीमती एस.बी. वळसे, बी.एन.गवाले, आर.आर.पिठ्ठलवाड आदींसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गंगाधर वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख कसबे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.