नांदेड उत्तरमधील प्रगतीपथावरील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा – आ.बालाजी कल्याणकर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व गुत्तेदारांची घेतली बैठक

186

नांदेड-

नांदेड उत्तर मतदारसंघात आ.बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. तर काही विकास कामे प्रगती पथावर आहेत. प्रगतीपथावरील अर्धवट विकास कामे पावसाळ्यापूर्वी तात्काळ पूर्ण करून घेण्याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित गुत्तेदार यांना सूचना केल्या आहेत. यावेळी आ.बालाजी कल्याणकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व गुत्तेदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन, सूचना केल्या आहेत.

नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकास कामे झाली आहेत. त्यात सध्या काही विकास कामे प्रगतीपथावर आहेत. अनेक गावांच्या मुख्य रस्त्यावर पूल, मुख्य रस्ते, पांदण रस्ते, शिव रस्ते यासह अन्य विकास कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांची गैरसोय होणार आहे.

हीच बाब लक्षात घेता, आ.बालाजी कल्याणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी. नरमिटवार, शाखा अभियंता कांबळे, तुपकरी, अंकिता महाजन यांच्यासह संबंधित सर्व गुत्तेदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत सर्वच कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत अशा सक्त सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण जर असेल तर ती मला तात्काळ लक्षात आणून द्या, त्यातून मार्ग काढू. पण कामात कुचराईपणा करू नका, कामे जलद गतीने करून पूर्ण करा, अशा सूचना केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.