नांदेड दक्षिण मतदारसंघातील 11 पैकी 10 ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व; आ.मोहनराव हंबर्डे यांचा दावा

204

नांदेड-

नुकत्याच झालेल्या बहुचर्चित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणार्‍या 11 पैकी 10 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून केवळ सोनखेड ही एकमेव ग्रामपंचायत काँग्रेसच्या हातून निसटली आहे.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आ.मोहनराव हंबर्डे यांचा विकास कामाचा ध्यास आणि त्याच दृष्टीने सुुरु केलेली कोट्यवधी रुपयांची कामे यामुळे मतदारसंघातील नागरिकांना सर्व मुलभूत सुविधा मिळत आहेत.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिणसाठी आजपर्यंत निधीची कमतरता भासू दिली नाही. मागेल त्याला सुविधा या न्यायाने आ.हंबर्डे यांनी विकास कामाचा सपाटा सुरु केला आहे.अनेक कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. त्याचीच जणू पावती या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी त्याला दिली आहे.

मडकी, मेंडेगाव, वाळकेवाडी, सिद्धनाथ, बळीरामपूर, मार्कड, बामणी, पांगर तर्फे विष्णुपुरी, खरबी आणि पळसी या दहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून सरपंच या सर्व गावात सरपंचपदाचा मान काँग्रेस उमेदवाराला मिळाला आहे.काँग्रेस उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करून मतदारांनी पुन्हा एकदा आपल्यावर विश्‍वास दर्शविल्याबद्दल आ.मोहनराव हंबर्डे यांनी मतदारांचे आभार मानले असून त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवून विकास कामांना आणखी गती देऊ असे आश्‍वासन दिले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या विजयाबद्दल कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी विजयी जल्लोष केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.