अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी साधणार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्याशी संवाद

240
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –

प्रख्यात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्याशी अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी सोमवारी (दि.१८) पुण्यात संवाद साधणार आहेत. विद्यार्थांसाठी ही एक ग्रेट भेट ठरणार असून त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत अशी माहिती पूण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे यांनी दिली. ही ग्रेट पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी गेल्या पाच वर्षांपासून पुण्यजागर प्रकल्प नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला मातेचा आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.विद्यार्थांना शैक्षणिक मदत, शेतकरी भगिनीला व्यावसायिक मार्गदर्शन करुन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भावामुळे दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे.गृह शिक्षणावर भर दिला गेला आहे. विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षण सोपे व्हावे यासाठी भोई प्रतिष्ठानच्या वतीने प्रख्यात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत दि. १८ एप्रिल सोमवार रोजी सकाळी दहा वाजता प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत.यावेळी भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, नागोराव भांगे, गुणवंत विरकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.