हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय आणि म्हैस ठार; तालुक्यातील खडकी (बा) आणि पावनमारी परिसरातील दुर्घटना

361

नांदेड-

नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दि.१२ च्या रात्रीला वादळी वारे, विजांचा गडगडाट होऊन अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याही रात्री ८ पासून सुरु झालेल्या विजेच्या गडगडाटात वीज कोसळून मौजे पावनमारी आणि खडकी बा.परिसरातील दोन शेतकऱ्यांच्या गाय आणि म्हैस दगावली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, शासनाने आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा.येथील शेतकरी नागोराव सूर्यभान सूर्यवंशी हे नेहमी प्रमाणे आखाड्यावर गावरान गाय बांधून घरी गेले होते. दरम्यान रात्री ८ नंतर वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटाला सुरुवात झाली. दरम्यान आभाळात कडाडलेली वीज अंदाजे वय ७ वर्ष असलेल्या पांढऱ्या गाईवर पडल्याने गाय दगावली. यात त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.

हेही वाचा ( Read This ) :  नरेंद्र – देवेंद्र महोत्सवात नांदेडकरांना मिळणार शनिवार आणि रविवारी सांस्कृतिक मेजवानी; देशातील नामवंत कवींची राहणार हजेरी

तर दुसऱ्या एका घटनेत राजू ग्यानबाराव सूर्यवंशी रा.खडकी बा.येथील शेतकरी असून त्यांची शेती पावनमारी शिवारात आहे. यांनी देखील नेहमीप्रमाणे आखाड्यावर म्हैस बांधून घर गाठले होते. त्यानंतर रात्री ८ ते ९ वाजेच्या वेळेत सुरु झालेल्या वादळी वारा विजांच्या गडगडाटात ६ वर्ष वय असलेल्या गाभण म्हशीवर वीज पडल्याने म्हैस दगावली. यात त्यांचे ९५ हजारांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही घटनेचा पंचनामा खडकी सज्जाचे तलाठी यांनी पंचासमक्ष केला आहे.या घटनेमुळे नुकसान झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांना शासनाने आपत्कालीन निधीतून मदतीचा हात द्यावा अशी मागणी पंचासह गावकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.