क्रुझर टिनशेडवर धडकली, एकाचा जागीच मृत्यू; हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव फाट्याजवळ घडली दुर्घटना

728

नांदेड-

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील एक व्यावसायिक क्रुझर गाडी तामसा येथील भाडे सोडून गावाकडे परत येत असताना एम.एच. 26, बी क्यू 7996 ही रोडवरून थेट खैरगाव शिवारातील टिनशेडवर धडकली. ही घटना दि.7 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली असून, या दुर्घटनेत एक जण बालंबाल बचावला असून, ड्रायव्हर नारायण कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील नारायण कल्याणकर हा तरुण क्रुझर गाडी नेहमीप्रमाणे भाडे घेऊन गेला होता. सदरील भाडे संबंधित गावाच्या ठिकाणी सोडून चालकासह अन्य एकजण आपल्या मूळ गावी परत येत होते. दरम्यान खैरगाव शिवारात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट शेतातील टिन शेडवरील झोपड्यावर धडकली. या घटनेत झोपड्यावरील पत्रावरील दगड थेट गाडीत घुसून गाडी चालक नारायण कल्याणकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना सोमवार दि.7 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचा पंचनामा सुरु केला आहे. या दुर्दवी घटनेमुळे सरसम बु.गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत गाडीचा चुराडा झाला असून, मोठे नुकसानही झाले आहे. काल याच गावातील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्यानंतर आज अपघातात एकाचा बळी गेल्याने सरसम गाव शोकसागरात बुडाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.