नांदेडातील हॉटेल अतिथी येथून बिल न देताच ग्राहक पसार..

हॉटेल मालकाची पोलिसात धाव

1,683
नांदेड – 
नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या हॉटेल अतिथी मधून १९ दिवसाचे लॉजींग व बोर्डींगचे बिल न अदा करताच ग्राहक पसार झाल्याचा प्रकार हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात येताच अतिथी हॉटेलचे संचालक श्री अखिल गुप्ता यांनी शिवाजीनगर पोलिस स्थानकात धाव घेत सदरील घटनेची माहीती पोलिसांना कळविल्याचे त्यांनी सांगितले..
या घटनेविषयी सविस्तर माहीती अशी की, नांदेडच्या शिवाजीनगर येथील अतिथी हॉटेल येथे अभिषेककुमार जैन ,रा.शिवाजीनगर , नांदेड नामक युवक हा हॉटेलमधील रुम क्रमांक ११२ मध्ये दि. २१/०१/२२ ते १/०२/२२ पर्यंत सलग वास्तव्यास होता व त्याने कपडे व बॅग असे आपले सामान हॉटेलच्या रुम मध्येच सोडून पोबारा केला आहे. या संदर्भात हॉटेल व्यवस्थापनाने संपूर्ण दिवसभर फोन करण्याचा प्रयत्न केला असता जैन यांनी फोन बंद केला असल्याची माहीती अखिल गुप्ता यांनी दिली.
अभिषेककुमार जैन हा नांदेड शहरातील प्रतिष्ठित सीड व फर्टिलायझर व्यापाऱ्याचा भाचा असल्याची विश्‍वसनीय माहीती असून अशा प्रकारे लॉजींगचे बिल न देताच ग्राहकाने पळ काढल्याचा प्रसंग आपण पहील्यादांच अनुभवला असून यांसदर्भात पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी हॉटेल अतिथीचे संचालक अखिल गुप्ता यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.