दशरथराव लोहबंदे यांच्या यशस्वी ५० वर्षे सामाजिक कार्याबद्दल यशदा पुणेच्या शिफारशीने दुबई सरकारकडून सन्मानाचे आयोजन
दादाराव आगलावे,
मुखेड, नांदेड –
जि.प.सदस्य तथा दलित चळवळीचे नेते दशरथराव मंगाजी लोहबंदे यांनी सामाजिक कार्याचे यशस्वी 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल, यशदा पुणे या संस्थेने यूएसई या राष्ट्राकडून निमंत्रित करून पाच दिवसीय राष्ट्राचा दौरा करून दिनांक 30 मार्च रोज बुधवारी दुबई येथील बुर्ज खलिफा या विशेष इमारतीमध्ये भव्य सत्काराचे आयोजन केले आहे. दि. 26 मार्च रोजी पुणे येथून दुबईकडे लोहबंदे यांचे विमानाने गमन होणार असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून अविरत आंबेडकरी चळवळ, दलित समाजासाठी पुढाकार घेऊन न्याय मिळवून देणारे सामाजिक कार्यासह सांस्कृतिक व धार्मिक, राजकारण, क्रीडा यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल यशदा पुणे या संस्थेने या कार्याची दखल घेऊन अरब अमीरात यु.ए.ई या सरकारकडे विशेष पुरस्कारासाठी शिफारस केल्याने दुबई सरकारने सामाजिक कार्यकर्ते तथा जि.प.सदस्य दशरथराव मंगाजी लोहबंदे यांना पुरस्कार जाहीर केला असून ५ दिवस राष्ट्राचा दौरा करून दिनांक 30 मार्च रोजी दुबई येथील महाराजा यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठी इमारत ‘बुर्जखलिफा’ या इमारतीमध्ये पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
दशरथराव लोहबंदे यांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झाली आहेत. चळवळीतील कार्याचा ठसा त्यांनी समाजमनावर उमटविला आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले आहे. अत्यंत अभ्यासू व फर्डा वक्ता म्हणुनही त्यांचा नावलौकिक आहे. दि.31 मार्च रोजी त्यांचे मुखेड शहरात आगमन होणार आहे, आगमनानंतर दुपारी दोन वाजता मुखेड शहरात जंगी स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.