ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे निधन; वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

332

लंडन –

बकिंगहॅम पॅलेसने गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची घोषणा केली आहे. एलिझाबेथ ही ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळणारी सम्राज्ञी होती. एलिझाबेथ यांचे आज दुपारी बालमोरल येथे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. सत्तर वर्षे त्या ब्रिटनच्या सम्राज्ञी होत्या. राणीच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स हा ब्रिटनचा सम्राट बनेल.

स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणीचे कुटुंबीय बालमोरल वाड्यात पोहोचले आहेत. प्रिन्स विल्यम, अँड्र्यू आणि एडवर्ड स्कॉटलंड मधील ॲबरडीन विमानतळावर उतरले आणि बालमोरल कॅसलकडे निघाले. ड्यूक ऑफ केंब्रिज, ड्यूक ऑफ यॉर्क देखील सोबत आहेत.

इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी आजोबा जार्ज पंचम यांच्या शासनकाळात झाला. त्यांचे वडील राजकुमार एल्बर्ट हे राजाचे दुसरे पुत्र होते. पुढे जाऊन ते राजा जॉर्ज सहावे बनले. त्यांच्या आई एलिझाबेथ, यॉर्क की डचेज ज्या पुढे राणी एलिझाबेथ बनल्या. त्या स्कॉटिश अर्ल क्लाऊडे बोव्स लॉन यांच्या छोट्या बहिण होत्या. 29 मे रोजी यॉर्कच्या प्रमुख पाद्री कॉस्मो गॉर्डन लँग यांच्याद्वारा त्यांना बकिंगहॅम महलातील एका खासगी प्रार्थना घरात इसाई धर्म प्रवेश (बेप्टिजम) देण्यात आला आणि एलिझाबेथ असे त्यांचे नामकरण करण्यात आले.

एलिझाबेथ आपल्या होणाऱ्या पती राजकुमार फिलिप यांना भेटल्या होत्या. त्यांची ही भेट 1934 आणि 1937 मध्ये झाली. फिलिप हे त्यांचे दूरचे नातेवाईक होते. पुढे त्यांची अधिक ओळख 1939 मध्ये शाही नौसेना महाविद्यालयात झाली. एलिझाबेथ एका ठिकाणी सांगतात की, त्या 13 वर्षांच्या असतानाच फिलिप यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी त्यांना पत्रव्यवहार सुरु केला. पुढे 9 जुलै 1947 मध्ये त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा झाली.

राणी एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स, यांची सून कॅमिला, नातू विलियम्स हे सध्या स्कॉटलँड येथे आहेत. राणी येथे सुटी घालविण्याकरिता आलेल्या होत्या. राणी काही महिन्यांपासून आजारी होत्या. Episodic Mobility हा आजार त्यांना असून वयोमानानूसार त्यांना या आजाराचा त्रास होत असल्याचे सांगितले जात होते. राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांना फेब्रुवारी मध्ये कोरोना देखील झालेला होता.

महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी आपल्या कारकिर्दीत इंग्लंडच्या जवळपास 15 पंतप्रधानांना शपथ दिली. त्यांनी विन्सटन चर्चिल द्वितीय यांच्यापासून ते रॉबर्ट एंथनी ईडन, मॉरिस हैरोल्ड मैकमिलन, अलेक्जेंडर फ्रेडरिक डगलस, जेम्स हेरोल्ड विल्सन , सर एडवर्ड रिचर्ड जॉर्ज हीथ , लियोनार्ड जेम्स कैलाघन , मार्गरेट थैचर , सर जॉन मेजर , टोनी ब्लेयर, डैविड विलियम डोनाल्ड कैमरन, थेरेसा मैरी मे, बोरिस जॉनसन यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. लिज ट्रस यांच्या रुपात त्यांनी पंधराव्या पंतप्रधानांना शपथ दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.