अर्धापूर सोसायटीच्या चेअरमन म्हणून देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी काजी रशिवोद्दीन यांची बिनविरोध निवड

968

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी प्रविण देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी रशीद काजी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.एस. जळके यांनी केली आहे.

अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक दि.२३ गुरूवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चेअरमन पदासाठी प्रविण देशमुख, रमेश मेटकर तर व्हाईस चेअरमन पदासाठी रशीद काजी, प्रमोद मुळे यांनी उमेदवारी दाखल केले होते. तसेच अर्जाच्या छाननीत रमेश मेटकर व प्रमोद मुळे यांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद करत चेअरमन पदी प्रविण देशमुख, व्हाईस चेअरमन पदी रशीद काजी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी एस. एस. जळके, सहाय्यक सखाराम पवार यांनी केली आहे.

सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी प्रविण देशमुख, व्हाईस चेअरमन पदी रशीद काजी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुस्वीर खतीब, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगरसेवक सोनाजी सरोदे, सलिम कुरेशी, गाजी काजी, व्यंकटी राऊत, शेख लायक, माजी सभापती व्यंकटराव साखरे, संचालक ओमप्रकाश पत्रे, सोनाजी साखरे, शंकराव वापटकर, वामनराव जोगदंड, लक्ष्मीबाई भालेराव, पंडितराव लंगडे, धारोजी कानोडे, गोपाल पंडित, पंडित शेटे, उमाकांत सरोदे, बाळू माटे आदींनी चेअरमन प्रविण देशमुख व व्हाईस चेअरमन रशीद काजी यांच्या निवडीचे जल्लोषात सत्कार करत स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.