धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना जिजाऊ प्रतिष्ठान, छावा तर्फे कोरोना सेवा योद्धा पुरस्कार
नांदेड –
गेल्या ३७ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून सतत कार्यरत असणारे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना जिजाऊ प्रतिष्ठान व छावा श्रमिक संघटनेच्या वतीने कोरोना सेवा योद्धा पुरस्काराने गौरव करुन नुकतेच सन्मानित करण्यात आले असून त्यांना आतापर्यंत साठ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर व जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भास्कर हंबर्डे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कोरोना काळात लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सतत कार्यरत असणे, तेरा वर्षात चार लाखापेक्षा जास्त गरजूंना जेवणाचे डबे देणे, हिवाळ्यात रस्त्यावरील बेघरांना ब्लँकेट देऊन मायेची ऊब देणे, कोरोना लस घेणाऱ्यांना एक वर्षापासून दररोज मास्क, सॅनिटायझर, बिस्किट, पाण्याची बॉटल वितरित करणे, अकरा महिन्यापासून दरमहा वेड्याची कटिंग दाढी, स्नान करून नवीन कपडे देऊन कायापालट करणे, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना धान्याचे किट वाटप करणे यासारखे अनेक उपक्रम दिलीपभाऊ ठाकूर यांनी राबविल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे भास्कर हंबर्डे यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी देखील राज्यातील बावीस सामाजिक संस्थांनी कोविड योद्धा म्हणून ठाकूर यांना सन्मानित केले होते. तसेच रेड एफएम तर्फे नांदेड के सांता हा पुरस्कार , धर्मभूषण ही उपाधी, मराठवाडा भूषण पुरस्कार, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार,राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार , मातोश्री गंगूताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, शान ए नांदेड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड देऊन देशभरातील विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांना पुन्हा एकदा कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.