अर्धापुरातील शहापूर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी दिगंबर पवार तर व्हा.चेअरमन म्हणून सौ.द्रोपदाबाई पवार यांची बिनविरोध निवड

726

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर तालुक्यातील शहापूर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी दिगंबर पाटील पवार यांची तर व्हाईस चेअरमन पदी सौ.द्रोपदाबाई पाटील पवार यांची दि.१५ मंगळवारी रोजी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी संजय एस.जळके, पंडितराव कपाटे,बंडू टेबुलवार यांनी करताच गावकरी मंडळीने जल्लोषात स्वागत केले आहे.

शहापूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सखाराम पवार, माजी सरपंच साहेबराव सोळंके यांच्या पुढाकाराने चेअरमन दिगंबर पवार, व्हाईस चेअरमन सौ.द्रोपदाबाई पवार यांची बिनविरोध निवड संचालक आनंदराव सोळंके, धोंडीबा पवार, साहेबराव सोळंके, साहेबराव पवार, राजाराम पाटील पवार, किशन सोळंके, रमेश ढगे, कामाजी बेळगे, अमृतकौर लोणीवाले, रोहिदास लोणे आदींच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यासाठी प्रयत्न केले. तर चेअरमन दिगंबर पवार, व्हाईस चेअरमन सौ. द्रोपदाबाई पवार यांच्या निवडीचे जल्लोषात सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी उपसरपंच भगवान पाटील पवार, राजू पाटील गायकवाड, तातेराव पवार व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.