हदगावात आझादी का अमृतमहोत्सव निमित्त दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण मोहीम

517

पुरुषोत्तम बजाज,

हदगाव, नांदेड.

हदगावात आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत निवघा (बा) जिल्हा परिषद गटातील 19 गावातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे दि.1 जूलै रोजी सकाळी 11:00 वा शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

या शिबिरात निवघा बा, शिरड, कोहळी, पेवा, मनुला बु, येळंब, साप्ती, माटाळा, तळणी, उमरी खुर्द, उंचेगांव बु, आमगव्हाण, चक्री, महातळा, भाटेगांव, ईरापुर, वाकी म, निवळा या गावातील अस्थिव्यंग व व नेत्रविकार असलेल्या दिव्यांग लाभार्थी यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जिवराज डापकर , गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड व वैद्यकीय अधीक्षक डॉ.ढगे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.