माहूर येथे दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण 

नारायण सेवा संस्थान उदयपूर व तालुका दिव्यांग सेवा समिती माहूरचा समाजउपयोगी उपक्रम

241

माहूर, नांदेड –

नर सेवा ही नारायण सेवा अर्थात मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून समाजातील नैसर्गिक अन्यायाने पिडीत असलेल्या दिव्यांग बांधवाची सेवा करून त्यांच्या आयुष्यात हास्य फुलविण्याचा उपक्रम घेऊन देशभर दिव्यांग बांधवाची सेवा करणाऱ्या नारायण सेवा संस्थान उदयपूर राजस्थान व तालुका दिव्यांग सेवा समिती माहूरच्या वतीने माहे जानेवारी मध्ये माहूर येथे भव्य दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात कृत्रिम अवयव देणे आवश्यक असलेल्या ८४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

सदर लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व इतर साहित्य वाटप करण्यासाठी दि.२७ रोजी तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार, नारायण सेवा संस्थानचे महाराष्ट्र प्रभारी हरीप्रसाद लढढा, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगरसेवक प्रा.विलास भंडारे, श्रीराम महाराज दिग्रसकर, राजु सौंदलकर, रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, डॉ.राम कदम, विनोद राठोड, मेघराज जाधव, प्राचार्य भगवानराव जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत कपिलेश्वर मंदिर माहूर येथे कृत्रिम अवयव वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी नारायण सेवा संस्थानचे महाराष्ट्र प्रभारी हरीप्रसाद लढढा यांनी प्रास्ताविकातून संस्थानच्या देशभर सुरु असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली, तर दिव्यांग सेवा समितीचे तालुकाध्यक्ष डॉ.राम कदम यांनी संस्थानतर्फे दरवर्षी दिव्यांगाच्या सेवेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवाना मदतीचा हात देण्यास नारायण सेवा संस्थान व दिव्यांग सेवा समिती माहूर तत्पर असल्याचे सांगितले.तहसीलदार किशोर यादव, डॉ.आशिष पवार व मान्यवरांनी नारायण सेवा संस्थान व दिव्यांग सेवा समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी संजय काण्णव, वसंत कपाटे, जयकुमार अडकीने, नंदकुमार जोशी, अपील बेलखोडे, विजय आमले, राज ठाकूर, बजरंग हजारी, गणेश चव्हाण, पद्मजा गीऱ्हे, सुरेखा तळणकर, आशिष जयस्वाल आदीसह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वासराव जाधव यांनी केले तर दिव्यांग सेवा समितीचे तालुकाध्यक्ष डॉ.राम कदम यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.