जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राजस्थानी मित्र परिवाराच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
नांदेड –
राजस्थानी मित्र परिवार, नांदेडच्या वतीने रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालय व आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा, नांदेड येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. राजस्थानी मित्र परिवार, नांदेडच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी राजस्थानी मित्र परिवार, नांदेडने दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उत्थानास हातभार लागावा व इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून दिव्यांग विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र दिले.
आज जागतिक दिव्यांग दिन….समाजाला आपल्या कर्तव्यांची आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा हा दिवस…आपण जे करू शकतो ते सर्व काही तेही करू शकतात…म्हणूनच त्यांना सहानभूती नाही तर विश्वासाची गरज आहे… दिव्यांगांना समान संधी देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजच्या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून प्रयत्न करु अशी अपेक्षा राजस्थानी मित्र परिवार, नांदेडद्वारे समाजातील प्रत्येक घटकांकडून यावेळी करण्यात आली.
यावेळी राजस्थानी मित्र परिवारचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजेंद्र शुक्ल व संतोष मानधने अध्यक्ष, दिनेश गुडगिला, सचिव महेश (मनीष) असावा, कोषाध्यक्ष आशीष भराडिया, उपाध्यक्ष किशोर शर्मा, ॲड.सुमित तोषणीवाल, सह-सचिव विजय गुरावा, सह-कोषाध्यश श्याम अजमेरा, सदस्य गणेश मंत्री, महेश दरक, चेतन शर्मा, अमित शर्मा व सर्व सदस्य उपस्थित होते.