प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भूषण जोशी यांच्या वतीने गरजू लोकांना अन्नदान वाटप
नांदेड –
प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण जोशी यांच्या वतीने आज महावीर चौक व रयत रुग्णालय कलामंदीर नांदेड येथे भाऊचा माणूसकीचा फ्रिज या उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले.
धर्मभूषण अॅड.दिलीपभाऊ ठाकूर यांनी नांदेड शहरातील महावीर चौक येथे फ्रिज बसविला आहे. या फ्रिजमध्ये दररोज किमान 40 डब्बे गरजूंना वाटप करण्यात येतात. या उपक्रमाला 108 दिवस पूर्ण झाले आहेत.नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये आणि अन्न वाया जाऊ नये यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्यामूळे या दिवशी कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नदान करण्याचा निश्चय केल्याचे सामाजिक कार्यकर्ते भूषण जोशी यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण जोशी, प्रभूदास वाडेकर, महेंद्र शिंदे व रयत रूगणालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.