शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांना मिळाले ‘हत्तीचे बळ’; खा.अनिल देसाई यांनी जिल्ह्यातील शिवसेनाच्या कामावर व्यक्त केले समाधान

आगामी काळात जिल्हाप्रमुखांना पक्षाकडून कोणते 'गिफ्ट' मिळणार यांकडे लागले सर्वांचे लक्ष

477

नांदेड-

शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी, न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या शिवसेनेने नांदेड जिल्ह्यात राबविलेल्या शिवसंपर्क अभियानातून जिल्ह्यातील तिन्ही जिल्हाप्रमुख यांना बळ मिळाले असून जिल्हा प्रमुखांच्या कामावर आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या पुनर्बांधणीवर शिवसेना सचिव तथा खा.अनिल देसाई यांनी तिन्ही जिल्हा प्रमुखांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील 19 जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले असून नांदेड जिल्ह्यात दिनांक 22 आणि 23 मार्च रोजी शिवसंपर्क अभियानानिमित्त नांदेड, लोहा, नरसी, किनवट, अर्धापूर आदी भागात शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या शिवसंपर्क अभियानामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आदेश खासदार अनिल देसाई यांनी दिले होते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पुनर्बांधणीमुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमद्धे नवं चैतन्य संचारले आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी आणि शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आजी-माजी पदाधिकारी कामाला लागले आहेत.

दि. 22 आणि 23 मार्च या दोन दिवसात नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागात खासदार अनिल देसाई यांचे दौरे झाले. नांदेड दक्षिण उत्तरचा विधानसभेचा मेळावा नांदेड येथे, लोहा कंधारचा मेळावा लोहा येथे, देगलूर नायगाव मुखेड विधानसभेचा मेळावा नरसी येथे, किनवट माहूरचा किनवट येथे, हदगाव हिमायतनगर विधानसभेचा हदगाव येथे मेळावा तर भोकर विधानसभेचा अर्धापूर येथे मेळावा घेण्यात आला.

या दौऱ्यात नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी खा.देसाई यांनी पाहिली. शिवाय यावेळी मुंबईहून सर्वे करण्यासाठी आलेल्या टीमनेही नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची परिस्थिती आणि लोकांमधील प्रतिमा पाहिल्यानंतर तिन्ही जिल्हा प्रमुख यांच्या कामांवर खासदार अनिल देसाई यांनी समाधान व्यक्त केले. या निमित्ताने नांदेडमध्येही पत्रकार परिषदेतही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यामुळे खासदार अनिल देसाई यांनी दिलेले पाठबळ जिल्हाप्रमुख यांना आगामी काळात अधिक जोमाने, ऊर्जेने काम करण्यासाठी नवं चैतन्य देणारे असून जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर आगामी काळात शिवसेना भगवा सन्मानाने फडकवेल असा विश्वास तिन्ही जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात तिन्ही जिल्हाप्रमुखांना पक्षाकडून कोणते ‘गिफ्ट मिळणार’ यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.