‘तुम्हाला काही कळत का?’, नक्कल करत राज ठाकरे राज्यपालांवर बरसले; संजय राऊत यांनाही लगावला टोला

501
पुणे –

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष जातीत अडकवून ठेवतात, इतिहासात नाही. राज्यपालांना काही समज वैगेरे काही आहे का? ते ज्योतिशासारखे आहेत. तुम्हाला शिवरायांबद्दल काही माहीत आहे का? संबंध नसताना शिवाजी महाराजांबद्दल बोलायचे. नको तिथं बोटं घालायची सवय राज्यपालांना आहे. त्यांना शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींबद्दल काही माहीत आहे का? महापुरूषांना बदनाम करणे, हाच त्यांचा उद्योग आहे”, अशी सणसणीत टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार. पावसाळ्यात निवडणुका घेणार आहात का? काय चाललंय राज्यामध्ये हेच कळत नाही.निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसींच राजकारण केलं जात आहे.

आजचे भाषण हे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण चित्रपट २ एप्रिलला शिवतिर्थावर असणार आहे. आता प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला संपवण्याचा डाव आहे. राजकारणात ते संजय राऊत कसली भाषा वापरत आहेत. कसेही बरळत आहेत”, असे बोलत राज ठाकरे यांनी शिवसेना नेता संजय राऊत यांची नक्कल करत टोला लगावला आहे.

युक्रेन आणि रशियाच्या युद्धावर बोलण्यापेक्षा तुमच्या घरातील बघा.आजही आत्महत्या होत आहेत. महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? लोकं आपले प्रश्न घेऊन जे आमच्याकडे येतात ना, हीच आपली १६ वर्षांची कमाई आहे. महाराष्ट्र सैनिक कोरोनाची कसलीच भिती न बाळगता लोकांपर्यंत पोहोचला. लोकं त्यांच्याकडे विश्वासाने येत होते. तुमच्यातील जी महाराष्ट्रासाठी काही करायची आग आहे ना ती विझू देऊ नका. शिवजयंती हा माझ्या राजाचा सण आहे. शिवजयंती तिथीनुसारच साजरी व्हायला हवी. शिवरायांमुळे आपली खरी ओळख आहे. शिवरायांच्या भूमीत आम्ही राहतो, त्यामुळे २१ मार्चला “शिवजयंती साजरी करा”, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.