नांदेडच्या डॉ.सान्वी जेठवाणी ठरल्या ‘मिस इंडिया प्लस साईज’ 2022 च्या विजेत्या

5,374

नांदेड –

मेवन प्रोडक्शन्स तर्फे देशपातळीवर विश्वसुंदरी स्पर्धा मिस इंडियाची स्पर्धा दिल्ली येथे आयोजित करण्यात येते. त्याचा पाचवा सिजन 21 ते 24 सप्टेंबर दरम्यान दिल्लीच्या विवांता द्वारका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. सदरील स्पर्धेमध्ये वजनाने जाड असलेल्या अशा युवती व महिलांना सहभाग नोंदवता येते. सुंदर दिसण्याचा अधिकार फक्त आकार पुरता मर्यादित नसून ही सुंदरता मनातून असली पाहिजे या हेतूने व जाड माणसांना सुद्धा सुंदर दिसण्याचा अधिकार आहे, हा उद्देश ठेवून या स्पर्धेला 2017 साली सुरुवात झाली. यावर्षीचे पाचवे वर्ष असून यामध्ये चार झोन मधून स्पर्धकांची निवड होत असते.

यामध्ये पश्चिम विभाग, पूर्व विभाग, दक्षिण व उत्तर अशा विविध चाचण्यामधून 900 स्पर्धकांनी पहिल्या चाचणीसाठी नोंदणी केली होती. यातून प्रत्येक विभागातून वीस स्पर्धक म्हणजे 80 स्पर्धकांची निवड दिल्लीच्या अंतिम फेरीसाठी झाली होती. या अंतिम फेरीतून 30 पुन्हा शेवटी दहा अशा सर्व चाचण्या पार करत अंतिम दहामध्ये पोहोचणारे नांदेडचे डॉ.सान्वी जेठवाणी ठरल्या दुसऱ्या मिस इंडिया प्लस साईज 2022.

या स्पर्धेचे परीक्षक प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित वर्मा, अभिनेत्री फिजा खान, मिस इंडियाच्या प्रशिक्षिका रिटा गंगवानी, अमन ग्रेवल, सिमरत कथुरिया व प्रसिद्ध सीने फोटोग्राफर अमित खन्ना व प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट चीना मरवाह ही सर्व मंडळी परीक्षक म्हणून काम पाहत होती. मेव्हेन्स प्रोडक्शनचे संचालक हरदीप अरोरा यांनी विजेत्याला सुंदरी ताज, स्मृतीचिन्ह व अनेक बक्षीस देऊन डॉ.सान्वी यांना मिस इंडिया प्लस साईज 2022 चे किताब दिले. यासोबत त्यांना सब टायटल म्हणून ग्लॅम गॉडस म्हणजे सुंदरतेची देवता हे किताब देखील दिले.

प्लस साईजमध्ये मिळणाऱ्या विश्वसुंदरीचा किताब भारतातील पहिल्या तृतीयपंथी असल्याचं मान डॉ.सान्वी जेठवाणी यांना मिळालं. आयोजक व परीक्षकांनी सान्वी या कुठल्या महिलापेक्षा कमी नसल्याचे आपल्या भाषणातून नमूद केलं. नांदेडसाठी एक मानाचा तुरा रोवणारी ही उपलब्धी आहे. यावेळी पत्रकारांना बोलताना जेठवाणी यांनी सांगितले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेले फार मोठे पुरस्कार व गिफ्ट आहे. विविध प्रॉडक्टच्या ब्रँडसाठी देखील त्यांना साईन करण्यात आले आहे. भविष्यात बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास ते आवडीने करू, असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

Leave A Reply

Your email address will not be published.