नियम मोडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर होणार खटला दाखल.!

679
अर्धापूर, नांदेड –

वाहन चालवतांना नियमांचे उल्लंघन केल्याने आकारण्यात आलेले दंड, वाहनचालकाने प्रलंबित दंड न भरल्यास खटला दाखल करण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी दंड भरून महामार्ग प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

रस्त्यावर वाहन चालवतांना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून महामार्ग पोलिसांनी वर्षभरात कार्यवाही करत मोठ्या प्रमाणात दंड लावला आहे. दंडाची प्रलंबित रक्कम भरण्यासाठी चालकांना १२ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दंड न भरल्यास १२ मार्च नंतर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. व संबंधितांवर खटला दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांनी दिला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात असून वाहन चालक दंड भरत नसल्याने थकीत रकमेचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी महामार्ग पोलीस प्रशासनाने प्रलंबित असलेल्या ई चलनाची रक्कम, दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. वाहन चालकांनी दंड भरून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांनी केले आहे.

◼️ २०२०-२१ मद्धे लाखो रूपये थकित

२०२० मध्ये २१ हजार २०७ वाहनांवर दंड लावण्यात आला असून एकूण ७६ लाख ९५ हजार ७५० रूपये रक्कम होत आहे तर २०२१ मध्ये २५ हजार २४ वाहनांवर दंड लावण्यात आला असून एकूण ९३ लाख ९५ हजार ३०० रूपये रक्कम होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.