अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.नवनाथ वरपडे यांची निवड

216

प्रदीप कांबळे,

लोहा, नांदेड –

लोहा अभिवक्ता संघाचा कार्यकाळ मावळत्या वर्षात संपुष्टात आल्याने संघाची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये अ‍ॅड.नवनाथ वरपडे यांची अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

लोहा बार असोसिएशनच्या सभागृहात दि.२८ डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत लोहा अभिवक्ता संघाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली.त्यामध्ये अध्यक्षपदी सर्वानुमते अ‍ॅड.नवनाथ वरपडे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.डि.व्ही.केंद्रे, सचिव अ‍ॅड.एस.के.ताटे, सहसचिव अ‍ॅड.पि.एम.शेट्टे, ग्रंथपाल अ‍ॅड.पि.एस.पाटील, महिला प्रतिनिधी अ‍ॅड.जयश्री क्षिरसागर यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सदर निवड प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी अ‍ॅड.डी.पी.बाबर यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड. अरविंद मोटरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी अ‍ॅड.डांगे, अ‍ॅड.बि.आर.गायकवाड, अ‍ॅड. जे.वाय.पठण, अ‍ॅड.पि.यु.कुलकर्णी, अ‍ॅड.एस.एल.लुंगारे, अ‍ॅड.एस.टि.गरूडकर, अ‍ॅड.एस.जी.जाधव, अ‍ॅड.एच.एम. पाटील, अ‍ॅड.चव्हाण, अ‍ॅड.नागरगोजे, अ‍ॅड.आर.डब्ल्यु. दासरे, अ‍ॅड.व्ही.टि.मच्छेवार, अ‍ॅड.व्ही.एन.घोडके, अ‍ॅड. नरेंद्र बोनागीरे, अ‍ॅड.बि.एम.गोरे, अ‍ॅड.एस.बी. कांबळे, अ‍ॅड.एन.व्ही.ठोंबरे, अ‍ॅड.राजन बाबर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.